Home आपला जिल्हा Breaking News मुल तालुक्यातील@जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थी पात्र

मुल तालुक्यातील@जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थी पात्र

129

 जवाहर नवोदय विद्यालयासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. यामध्ये मुल तालुक्यातील विविध शाळांतील 5 विद्यार्थी पात्र ठरले आहे. केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली होती.

तळोधी बा. येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ही परीक्षा होती. यासाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. परीक्षेच्या निकालानंतर 05 विद्यार्थी पात्र ठरले आहे. या प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन स्तरांवर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते.

जवाहर नवोदय विद्यालय करीता मूल तालुक्यातील निवड झालेले विद्यार्थी
1) नयन अमित गहाणे
2) शुभम गणपत दुरके
3) प्रांजल प्रफुल वाकडे
4) सक्षम छबीलदास गोवर्धन
5) प्रतिक लहू सिडाम

    यामध्ये मुल तालुक्यातील 5विद्यार्थी पात्र ठरले आहेत.तालुक्यातील विद्यार्थ्यांचा निकाल अत्यंत कमी असल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या तालुक्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.