Home आपला जिल्हा Breaking News राज्यस्तरीय एसबीसी आरक्षण बचाव समीतीच्या सदस्यपदी डॉ बंडू आकनुरवार

राज्यस्तरीय एसबीसी आरक्षण बचाव समीतीच्या सदस्यपदी डॉ बंडू आकनुरवार

124

राज्यातील एसबीसी प्रवर्गातील 51 पोटजातीतील समाजाची महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली. नुकतीच पुणे येथे एसबीसी आरक्षणाबाबत राज्यस्तरीय सभा घेण्यात आली
या सभेमध्ये राज्यात एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी, विधिमंडळात मंजुर एससी/एसटीच्या धर्तीवर सर्व सवलती जशास तसे मिळण्यासाठी व एसबीसीला नानक्रीमीलेयर मधुन सुट देण्याबाबत ,मुंबई उच्च न्यायालयातील केसेस संदर्भात व इतर समस्यांबाबत सभेमध्ये चर्चा करून ठराव घेण्यात आले.ही समीती शासनस्तरावर मंत्रीमहोदय, प्रधान सचिव , न्यायालयीन व इतर कार्य करेल
या सभेमध्ये राज्यस्तरीय एसबीसी आरक्षण बचाव उपसमीतीची 22 कार्यकारी सदस्याची स्थापना करण्यात आली.एसबीसी आरक्षण टिकवणे व इतर समस्यांबाबत राज्यस्तरीय सुकाणुसमीतीला विश्वासात घेऊन कार्य करावयाचे आहे.या समीतीच्या कार्यकारी सदस्य पदी एसबीसी संघर्ष समितीचे विदर्भ उपाध्यक्ष,विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे तथा चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ बंडू आकनुरवार यांची निवड करण्यात आली.ते गेल्या 20 वर्षांपासूनसमाज,संघटनेचे,सामाजिक ,ग्रामविकासाचे व शशीकांत आमणे यांच्या मार्गदर्शनात एसबीसी आरक्षण व इतर कार्य करीत आहे. सोबतच अशोक इंदापूरे सोलापूर, विजय रच्र्चेवार पुणे,हिरालाल पगडाल संगमनेर या समाजबांधवाची निवड केली आहे
त्यांच्या निवडीबदल विदर्भ पद्मशाली संघम अध्यक्ष संजयबोम्मावार,सचिव निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजु आनंदवार, विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे सचिव प्राचार्य शंकर दिगदेवतुलवार, प्रा.विजय यंगलवार, डॉ चंद्रशेखर अल्लेवार, तुळशीदास मारशेट्टीवार, इजि.राजेंद कटकमवार, संतोष वासलवार, राजु यंगलवार, हरीभाऊ बिटुरवार,मोरेश्वर कुरेवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.