मूल (वा.). संगणकीय प्रक्रियेत स्वराजने अल्पवयातच उत्तुंग भरारी घेतली असून त्याने अनेक संगणकीय प्रोग्राम विकसित केले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कार्याची विदेशातसुद्धा दखल घेण्यात आली आहे.
स्वराज पुप्पलवार एक 15 वर्षांचा स्वयं-शिक्षित कोडर आहे. 2019 पासून त्याने पायथॉन, जावा, सीसी प्लस, एचटीएमएल, सीएसएस, जावा क्रिप्ट, नोड जे एस सारख्या विविध प्रोग्रामिंग भाषा शिकण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्याला कोडिंगची आवड आहे.
उदेमी आणि यु ट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरील पुस्तके, ऑनलाइन ट्यूटोरियल्सद्वारे त्याने कोडिंग कौशल्य प्राप्त केले आहे. सध्या स्वराज बी. जे. एम. कारमेल अकादमी (सीबी एससी) मध्ये इयत्ता 10 मध्ये शिकत असून, सॉफ्टवेअर, अॅण्ड्रॉइड अॅप्स, वेबसाइट्स आणि गेम्स यशस्वीपणे तयार केले आहेत.
सक्रेस्ट सायबर ऑलिम्पियाड पश्चिम विभागीय रँक 17, आंतरराष्ट्रीय संगणक ऑलिम्पियाड आणि आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये राज्य क्रमांक 30 व्या राष्ट्रीय मुलांच्या विज्ञान काँग्रेसमध्ये सहभाग, शाळेतील सायबर सॉफ्टवर्ल्ड ऑलिम्पियाडमध्ये 2रा क्रमांक, आणि परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्राप्त केले. स्वराजचे वडील जिप शाळेत सादागड शिक्षक आहे.






