मुल — तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभाथ्र्यांना आधारकार्ड,बॅंक पासबूक,मोबाईल युआयडीकार्ड तहसील कार्यालय मूल येथे संबंधीत विभागातील कर्मचारी मार्फत किंवा स्वता तहसील कार्यालय मुल येथे जमा करण्याचे शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.व ते बंधनकारक करण्यात आले आहे.
फक्त जुने लाभार्थी यांनी आधार कार्ड बँक पासबुक व त्यांचा मोबाईल क्रमांक संबंधित तलाठी कार्यालयात जमा करावा. लाभार्थी पडताळणीच्या याद्या तलाठी यांना दिलेल्या आहे. तरी लाभाथ्र्यानी यांची नोंद घ्यावी.
तरी तालुक्यातील सर्व निराधार,विधवा,अपंग,वृदधकाळ व्यक्तींनी त्यांचे आधारकार्ड,बॅंक पासबूक,मोबाईल युआयडीकार्ड कार्यालयात किंवा तलाठी आफीस मार्फत जमा करण्याचे माननिय तहसील संजय गांधी निराधार योजना यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे.
तरी विलंब न करता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाथ्र्यांनी आपले आधार कार्ड,बॅंक पासबूक,मोबाईल, युआयडीकार्ड स्वावलंबन कार्ड जमा करावे.व वरील योजनेचा नियमीत लाभ घेण्यात यावा.
Post Views: 214