Home आपला जिल्हा Breaking News राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना@घरातला कमावता गेला; सरकारी मदत मिळते, पण कधी?

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना@घरातला कमावता गेला; सरकारी मदत मिळते, पण कधी?

211

घरातला कमावता गेला;  सरकारी मदत मिळते, पण कधी?
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना : अनेकांनी दाखल केले प्रस्ताव राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य  योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी कुटुंब प्रमुखाचे वय १८ ते ५९ वर्ष असणे गरजेचे आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षापर्यंत शासनाकडे मदतीसाठी अर्ज करता येते.  आजपर्यंत शेकडो कुटुंबीयांना याअंतर्गत मदत झाली आहे. विशेष केंद्र शासनाकडून अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. दारिद्ररेषेखालील लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेकडो जणांचे अर्ज प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारकडून निधी आल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना एकदाच २० हजारांची मदत केली जाते. यासाठी संबंधित कुटुंबीयांना गावातील तलाठी किंवा तालुका प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर प्रस्ताव मंजूर होतो.
काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसाहाय्य योजना? ■ दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्या कुटुंबाला योजनेंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसाह्य केले जाते. त्यासाठी रीतसर तहसील प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. मृत्यूनंतर ती वर्षापर्यंत हा अर्ज करता येतो.
कोणाला मिळतो लाभ?
■ लाभार्थी हा जिल्ह्याचा रहिवासी असावा, तो दारिद्रयरेषेखालील असावा, या दोन अटी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी योजनें- तर्गत प्रस्ताव अर्ज करावा लागतो. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभ वितरित केला जातो.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाते. या योजनेसाठी कुटुंबप्रमुखाचे वय १८ ते ५९ वर्षे असणे आवश्यक असून, कुटुंब दारिद्रय रेषेखालील असावे. मृत्यूनंतर तीन वर्षापर्यंत कुटुंबियांना प्रशासनाकडे अर्ज सादर करता येते.
–  डॉ.रविंन्द्र होळी, तहसीलदार.