Home आपला जिल्हा Breaking News दुचाकी अपघातात बाप – लेकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात बाप – लेकाचा मृत्यू

134

जिवती : मुलांची आरोग्य तपासणी करून दोन मुलांना घेऊन वडील दुचाकीने घराकडे निघाले होते. मात्र, वाटेत त्यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी थेट पुलाच्या खाली कोसळली. या दुदैवी घटनेत बापलेकाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना जिवती तालुक्यातील परमडोली – जिवती मार्गांवर घडली. सचिन राजाराम गायकांबळे (वय ४०), अनुष सचिन गायकांबळे (वय ७) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. जखमी मुलाला उपचारासाठी जिवती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आले आहे.
जिवती तालुक्यातील केकेझरी येथील सचिन राजाराम गायकांबळे आपल्या दोन मुलांना घेऊन दुचाकीने जिवती येथे सोमवारला गेले होते. मुलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर सायंकाळी सहा वाजताचा सुमारास जिवती येथून मुलांना घेऊन दुचाकीने गावाकडे निघाले होते.परमडोली- जिवती मार्गांवरून जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पुलाखाली कोसळली.