राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात.
मुंबई : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी झाळांमध्ये
असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी १ मार्चपासून
सुरू केली होणार आहे. एका विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा एकही
अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, असे प्राथमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे
आरटीईसाठी अर्ज भरताना पालकांनी खबरदारी घेऊन अर्ज भरणे आवड्यक राहणार आहे.
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले
जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात.
दरम्यान, वंचित गटातील बालकांना आर्थिक उत्पन्नाची मर्यादा लागू नाही आणि ज्यांचे उत्पन्न एका लाखापेक्षा
कमी आहे, अज्ञांचा आर्थिक दुर्बल घटकांत समावेझा होतो, हे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पालकांनी अर्ज
भरताना जास्तीत जास्त १० झाळांची निवड करायची असून, गुगल मॅपचा वापर करत घरापासून झाळेचे
स्थान निश्चित करायचे आहे. यामध्ये पालकांना केवळ ५ वेळा स्थान निश्चित करता येणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
ए आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कागदपत्रांची ही माहिती प्राथमिक
संचालनालयाकडून देण्यात आली आहे. निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, घरपट्टी, मतदान
ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यातील एक पुरावा ग्राह्य धरता येईल.
ए याशिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत
असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवडयक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटित महिला
असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या
वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.
Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023- 24 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 1 /3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 17/3/2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील
महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.






