रब्बी पीक हरभरा कापल्यानंतर रानटी डुकराने केले फस्त !
मूल ■ एका उत्पन्नावर विसंबून राहता बेरोजगारीवर मात करण्यासाठी रब्बी हंगामात स्वतःच्या शेतात पिक घेवुन रोजगार प्राप्त करणाऱ्या प्रशांत मेश्राम यांच्याशेतातील हरबऱ्याची कापणी करूनअसलेल्या हरबरा डूक्करांनी फस्तकेल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयाचेनुकसान झालेले आहे.मूलतालुक्यातील मौजा मारोडा येथील
प्रशांत मेश्राम यांनी अडीच एकर शेतात रब्बी हंगामात हरबऱ्याची लागवड केली होती.
पीक पूर्ण झाल्यावर दोन दिवसापुर्वी काढणीला आलेले चना पीक त्यांनी कापून ठेवले होते. दरम्यान रात्रीच्या वेळेस डुक्कराच्या कळपाणे संपूर्ण चणा फस्त केला आहे. मेश्राम यांच्या जवळपास २० क्विंटल चण्याच्या पिकाची नुकसान झाली असून शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागले आहे.






