Home आपला जिल्हा Breaking News पोलिस स्टेशन मूल व उपजिल्हा रुग्णालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी...

पोलिस स्टेशन मूल व उपजिल्हा रुग्णालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

132

पोलिस स्टेशन मूल व उपजिल्हा रुग्णालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन मूल येथे दिनांक २५/०२/२०२३रोजी पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन मूल उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे हस्ते करण्यात आले.मूलचे नवनियुक्त ठाणेदार सुमित परतेकी व मूल उपजिल्हा रुग्णालयाचे नवनियुक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवेंद्र लाडे याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.खाकी वर्दितला पोलिस कर्मचारी २४तास आपले कर्तव्य बजावित असताना बरेचदा आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष करतो आणि मग कधिकधी त्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, ही बाब हेरून

चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे सुचनेनुसार मूल पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणी, ज्यामध्ये ईसीजी, रक्तशर्करा, रक्तदाब, रक्ततपासणी, दंतरोग, व नेत्ररोग तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या इतर आजाराची तपासणी एका शिबिरात करण्याचे ठरले व तसे आयोजन करण्यात आले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्राची यांचेसह मूल उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. चमू व इतर सहकारी यांनी पोलिस ठाण्यात उपस्थित राहून सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सखोल तपासणी केली.

याप्रसंगी बोलताना मूल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी म्हणाले, या शिबिराचे माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची एकाच ठिकाणी तपासणी होईल आणि आपल्या कर्तव्यात दक्ष असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर काही रोगाची लक्षणे दिसून आली तर त्यावर उपचार करणे सोयीचे होईल व ते अधिक कार्यक्षम राहातील या उद्देशाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कुणाला काही गंभीर आजार आढळून आला वा कुठल्या उपचाराची गरज असेल तर वरिष्ठांच्या सल्ल्याने त्यावर वेळीच निदान करणे सोयीचे ठरणार आहे.

याप्रसंगी, सहा.पोलिस निरीक्षक सतिश बन्सोड, सहा.पोलिस निरीक्षक, उत्तम कुमरे,सुनील घोडमारे,व सचीन सायंकारसह इतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते व या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिपूर्ण योगदान देत होते.