नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे. आता याच अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची (Agriculture) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुमचं नाव या यादीत आहे का नाही.
प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची (Subsidy) दुसरी यादी ऑनलाईन प्रकाशित करण्यात आली आहे. csc पोर्टलवर प्रकाशित होत आहे.






