एमबीबीएस शिक्षणाचे काळात डाँ. सोनल टहलीयानी यांनी विद्यापीठात तीसरी रँक मिळवित ब्राँझ मेडालची विजेता ठरली. पाँडीचरी येथील विनायक मिशन वैद्यकीय महाविद्यालय येथुन डाँ.सोनल यांनी प्रसुती व स्ञीरोग तज्ञचे अभ्याक्रम पुर्ण केले. स्थानिक उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिका-यांची वाणवा असुन स्ञीरोग तज्ञाची अत्यंत निकड होती. डाँ. सोनल यांच्या रूपाने स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात स्ञीरोग तज्ञाची कमतरता दुर झाली आहे.
येथील उपजिल्हा रूग्णालयात रूजु होण्यापुर्वी डाँ. सोनल टहलीयानी यांना नागपूर येथील काही नामांकित वैद्यकीय संस्थेत बोलावणे आले होते परंतु आपल्या शिक्षण आणि अनुभवाचा लाभ त्यांनी आपल्या तालुक्यातीला जनतेला देण्यात धन्यता माणुन येथील उपजिल्हा रूग्णालयात कालच त्या रूजु झाल्या. त्यांच्या या कार्याबद्दल शहरातील नागरीकांनी डाँ. सोनल टहलीयानी यांचे अभिनंदन केले आहे.