Home आपला जिल्हा देहेगाव शेतशिवरात वीज पडून एका तरुण आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू

देहेगाव शेतशिवरात वीज पडून एका तरुण आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू

123

मूल
तालुक्यातील देहेगाव शेतशिवरात वीज पडून एका तरुण आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू .
येथून जवळच आठ की.मी. अंतरावर असलेल्या देहेगाव येथील विलास रामुजी अलाम वय ४२ वर्षे हा तरुण आदिवासी शेतकरी आपल्या शेतात शेतीकाम करीत असताना आज २९ जुलै रोजी १-०० वा. चे दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला त्यात वीज पडून विलास रामुजी अलाम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबातील कमावती व्यक्त्ती गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे . कुटूबातील आईवडील पत्नि मुलगा मुलगी यांचा आधारच गेल्याने सदर कुंठूबाची मोठी हानी झाली .
घटना स्थळावर पोलिस अधिकारी ‘ महसुल प्रशासनचे अधिकारी तात्काळ जावून पंचनामा केला . कुठूबीयाना प्रशासनाच्या वतिने तात्काळ मददत देण्यात यावी . अशी येथिल जनतेची मागणी आहे.