प्रवास करताना स्मार्ट कार्ड नसेल तर, आता एसटीत लागणार फुल टिकीट १ जुलैपासून होणार अंमलबजावणी : महाराष्ट्र राज्य परिवहन
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊनच लालपरीची धावपळ सुरू असते. महामंडळाकडून प्रवाशांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाते. या सवलतीमध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. याकरिता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, १ जुलैपासून ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना फुल तिकीट काढावे लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाला दोन वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पाच महिने कर्मचाऱ्यांचा संप, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. 

या समाजघटकांना मिळते प्रवासात सवलत :-
दिव्यांग व्यक्ती, राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मासिक पास सवलत, स्वातंत्र्यसैनिक व एक साथीदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत व त्यांचे एक साथीदार, अहिल्याबाई होळकर योजनेत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी, अंध व अपंग व्यक्ती आणि त्यांचे मदतनीस, क्षयरोगी, कर्करोग (उपचारासाठी), राज्य शासनाने पुरस्कृत केलेले विजेते स्पर्धक, अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारप्राप्त व एक साथीदार, शासकीय पूजेचा मान मिळालेले वारकरी दाम्पत्य, विधानसभा सदस्य व साथीदार, माजी विधान मंडळ सदस्य व साथीदार, रेस्क्यू होममधील मुले, पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या, अपंग विद्यार्थी, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व साथीदार, नैमित्तिक करार, शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार, विद्यार्थ्यांना मोठ्या सुटीत त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सवलत, परीक्षा, शैक्षणिक काम यासाठी सवलत, आजारी आई-वडिलांना भेटण्यासाठी सवलत, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व्यक्ती व शहीद जवानांच्या वीरपत्नी यांना सवलत दिली जाते.







