महत्वाच्या कामादरम्यान अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राचीगरज लागते आणि शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागते.हे प्रमाणपत्र मिळण्यास सामान्यपणे 8 ते 15 दिवसांचा कालावधी लागत असल्याने काहींच्या नोकरीच्या संधी हुकतात,आवडत्यामहाविद्यालयात प्रवेश मिळत नाही किंवा शासकीय योजनेच्यालाभापासून वंचित राहावे लागते. यापासून वाचण्यासाठी आजच डोमिसाईल प्रमाणपपत्रासाठी अर्ज करा.
किती शुल्क लागते ? 34 रूपये
कुठे मिळते ? तहसीलदार कार्यालयातील सेतू,आपले सरकार सेवा केंन्द्र या
शासनाच्या संकेतस्थळावर प्रमाणपत्र काढता येते.
कोणती कागदपत्रे लागतात ?
ओळखीचा पुरावा (कोणताही एक)ः- पॅनकार्ड,पासपोर्ट आधारकार्ड,मतदान कार्ड,अर्जदाराचे छायचित्र,निमशासकीय ओळखपत्र,रोजगार हमी योजना ओळखपत्र,वाहनचालक परवाना
पत्याचा पुरावा(कोणताही एक)ः- पासपोर्ट,वीज देयक,दूरध्वनी देयक, शिधापत्रिका, भाडेपावती,मालमत्ता,कर पावती,मालमत्ता नोंदणी उतारा 7/12 आणि 8 उतारा,
वयाचा पुरावा(कोणताही एक :- जन्मदाखला,बोनाफाईड,सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला,वडिलंाचे अधिवास प्रमाणपत्र,सेवा पुस्तिका,(शासकीय निमशासकीय कर्मचरी)
रहिवासी पुरावा(कोणताही एक :- ग्रामसेवक,तलाठी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला आणि स्वयंघोषणापत्र,विद्याथ्र्यांसाठी 18 वर्षापासून कमी असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला,वडिलांचे डोमिसाईल प्रमाणपत्र,शाळा प्रवेशाचा पुरावा







