आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून मूल पंचायत समितीला रूग्णवाहीका भेट

30

मूल:- दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी वित्त,नियोजन व वनमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी
कार्यालय मूल येथे विविध विभाभांचे अधिकारी व भाजपा पदाधिका-यांची कोरोना आढावा बैठक घेतली.या बैठकीत असे लक्षात आले की,अनेक जण ग्रामीण भागातून केारोनाबाधित होत आहे.पंरतु त्याच्या घरी विलगीकरणाचीसोय नाही. त्याचप्रमाणे बाधितांना मूल येथील विलीकरण कक्षात येण्यास गैरसोईचे होत आहे. आमदार सुधीर मुनगंटीवारयांनी या समस्येवर तोडगा काढून गा्रमीण जनतेसाठी चारचाकी रूग्णवाहीका देण्याची घोषणा केली आहे.

गुरूवार 29 एप्रिल ला मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी रूग्णवाहिका मूल पंचायत समितीचे गटविकास
अधिकारी डाॅ. मयूर कळसे यांच्या सुपूर्द केली.

या रूग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळणार असून, प्रशासनाची गा्रमीण भागातून रूग्ण आणताना होणारी
दमछाक थांबणार आहे. पुढाकार घेतल्याबदल तालुक्यातील अधिकारी,भाजपा पदाधिकारी व कार्यक-यांनीआ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.