1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

37
केवळ जिल्हा मुख्यालयी साधेपणाने सकाळी 8 वाजता होणार ध्वजारोहण कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयी अत्यंत साधेपणाने व कमीत कमी उपस्थित आयोजित करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार शनिवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न होणार आहे.