मूल येथील महिला सभागृहात कोरोना केअर सेंटर सुरू करा-अशी मागणी माजी नगरसेवक मोतिलाल टहलीयानी यांनी केली आहे.

62

मूल : विविध समाजातील महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने शासनाने काही वर्षापूर्वी चंद्रपूर मार्गावर महिला सभागृहाचे बांधकाम केले. महसूल प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या महिला सभागृहाचे बांधकाम झाल्यानंतर सुरूवातीचे काही वर्षे सदर महिला सभागृह महिलांसोबतच अन्य संस्थांनाही वेगवेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दिला जात होते. कालांतराने मात्र सदर सभागृहाचा उपयोग शासकीय कार्यालयाकरिता करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यालयाकरिता वापरण्यात येत असलेल्या या सभागृहात प्रशासकीय भवनाचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत तहसील कार्यालय होते. अलीकडे नगर परिषद इमारत निर्माणाधिन असल्याने सदर भवनात नगर परिषद कार्यालय सुरू आहे. येत्या काही दिवसात नगर परिषदेच्या इमारतीचे काम पुर्ण होणार असून भवनात सुरू असलेले नगर परिषद कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित होणार आहे. त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या महिला सभागृहात पुन्हा दुसरे कोणतेही शासकीय कार्यालय किंवा उपक्रम सुरू न करता सध्यास्थितीत शासनाला अत्यावश्यक असलेले कोरोना केअर सेंटर कायमस्वरूपी सुरू करावे, अशी मागणी मोतिलाल टहलीयानी यांनी केली आहे.महसूल प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या चंद्रपूर मार्गावरील महिला सभागृह येथे कायम स्वरूपी कोरोना केअर सेंटर सुरू करून प्रशासनाने नागरिकांना आरोग्याची सेवा पुरवावी, अशी मागणी माजी नगरसेवक मोतिलाल टहलीयानी यांनी केली आहे.

                      सदर सभागृह कोरोना केअर सेंटरच्या दृष्टीने सर्व सोयीचे असून किमान ५० खांटाची व्यवस्था याठिकाणी प्रशासनाला करता येणार असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने विचार करावा, अशी विनंती टहलीयानी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.