पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांचे निधन. #death

21

पोंभुर्णा तालुका भाजपा अध्यक्ष व न.पं. चे माजी अध्यक्ष श्री गजानन गोरंटीवार यांचे निधन.

पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, नेता हरपला. गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. गजानन गोरंटीवार हे भाजपा तालुकाध्यक्ष म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न  मांडणारा व्यक्ती म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. गजानन गोरंटीवार यांना किडनी चा आजार होता. ते श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे उपचार घेत होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पक्ष संघटनेतला कोहीनुर गमावला – आ. सुधीर मुनगंटीवार

भाजपा पोंभुर्णा तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार यांच्‍या  निधनाने कोहिनुर हि-यासारखा कार्यकर्ता आम्‍ही गमावल्‍याचे तीव्र दुःख मला आहे. अशा शब्‍दात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्‍यक्‍त केली आहे.

गजानन गोरंटीवार यांच्‍या निधनाने माझा अतिशय ह्रदयस्‍थ पदाधिकारी हरपला आहे. पोंभुर्णा शहर असो वा तालुक्‍याचा ग्रामीण भाग भाजपाचे संघटन बळकट करण्‍यासाठी त्‍यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा हा नेता पोंभुर्णा तालुका भाजपाची जमेची बाजु होती. असा सह्दयी, लोकाभिमुख नेता अल्‍पवयातच हे जग सोडुन जाणे ही बाब प्रचंड धक्‍कादायक आहे, या बातमीवर माझा काही काळ विश्‍वासच बसला नाही. त्‍यांच्‍या निधनाने भाजपा परिवारासह एकुणच राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्‍यांच्‍या परिवारावर कोसळलेले दुःख मोठे आहे. या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटुंबियांना परमेश्‍वर देवो असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.