Home आपला जिल्हा करोनामुळे ठरलेले मुहूर्त रद्द करून लग्नसोहळे लांबणीवर,

करोनामुळे ठरलेले मुहूर्त रद्द करून लग्नसोहळे लांबणीवर,

105

करोनामुळे ठरलेले मुहूर्त रद्द करून लग्नसोहळे लांबणीवर,
⭕वातावरण सुरळीत झाल्यानंतरच निर्णय होणार……… की मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार?

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा फटका यंदाच्या लग्नसराई हंगामालाही बसला आहे.दणक्यात बार उडवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांना यापूर्वी ठरलेले मुहूर्त रद्द करून अनिश्चित काळासाठी लग्नसोहळे लांबणीवर टाकण्याचा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला आहे.गेल्या १३ महिन्यांपासून करोना रुग्ण आढळून येत आहेत.मधला काळ वगळता करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले.एक मेपर्यंत टाळेबंदी घोषित केली.या वातावरणाचा फटका सर्वानाच बसला असून लग्नसराईचा हंगाम त्यातून सुटलेला नाही.
करोनामुळे गेल्या वर्षीच्या लग्नसराई हंगामाचे बरेच नुकसान झाले.यंदा गतवर्षीपेक्षा वाईट परिस्थिती आहे.मार्चपासून सुरू होणारे लग्नसोहळे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस चालतात.यंदा मुली-मुलाचे घरातील कार्य उरकायचे म्हणून काही महिन्यापूर्वीच तारखा आरक्षित करून ठेवलेल्या कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती.

प्रत्यक्षात, वेळ जवळ आली, तेव्हा करोनामुळे परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती.सध्याच्या वातावरणात मनासारखा लग्नसोहळा होणे अवघड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी ते लांबणीवरच टाकण्याचा मार्ग स्वीकारला.लग्नासाठी यापूर्वी ५० जणांची उपस्थिती बंधनकारक होती.आता ती २५ आहे. दोन्हीकडील जवळचे नातेवाईक, मित्र परिवाराला विवाहासाठी आमंत्रित करणे अनिवार्य आहे.
त्यामुळे अत्यल्प मर्यादेत लग्नसोहळे घेता येत नाहीत.अशी धारणाच होऊन गेली आहे.मोठय़ा घराण्यांमध्ये हजारोंची उपस्थिती हा लौकिकाचा भाग मानला जातो. परिणामी लग्नसोहळा लांबणीवर टाकण्याचा पर्याय निवडला जातो आहे.दुसरीकडे हा सोहळा लांबणीवर टाकण्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे हा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे असा विचार करून तो मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करणे याला प्राधान्य देण्यात आले पाहिजे असा विचार करून तो नियोजित तारखेला स्थळ बदलून पार पाडण्यासाठी धडपडणारे ही कुटुंब दृष्टिस पडत आहेत.एकंदरीत लग्नसोहळा हा विषय प्रचंड चर्चेत आला आहे.