मूल (प्रतिनिधी)
कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असलेल्या महसुल प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकुन राञोच्या वेळेस नदी घाटामधुन रेती उपसा करून वाहतुक करण्याचा प्रयत्न करताना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने रेती विक्रेते दणाणले आहे.
महसुल अधिकारी कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रयत्नरत असल्याने त्यांना तालुक्यातील रेती घाटांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ही संधी साधुन काही रेती विक्रेते राञौची संधी साधुन तालुक्यातील रेती घाटांवरून रेती उपसा करून वाहतुक करण्याची शासनाची परवानगी न घेता वाहतुक करून शासनाला चुना लावत असल्याची माहीती पोलीस प्रशासनाला होती. काल राञी काही रेती विक्रेते राञौची संधी साधुन तालुक्यातील भेजगांव नदी घाटामधुन विना परवाना रेती उपसा करून वाहतुक करीत असल्याची माहीती ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांना मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या आधारे ठाणेदार राजपुत यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला सदर रेती घाटावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज (२०/४/२०२१) चे पहाटे १.१५ च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी पोउनि पुरूषोत्तम राठोड, सपोफौ यशवंत कोसमशीले, तिमाजी देवकाते, सचिन सायंकार, संजय जुमनाके, शफीक शेख, गजानन कुरेकर आणि श्रावण कुत्तरमारे पाळतीवर असतांना तालुक्यातील भेजगांव रेती घाटावर मोबाईल मधील लाईटच्या प्रकाशात दोन ट्र्ँक्टर मध्ये रेती भरत असतांना आढळुन आले. याबाबत पोलीसांनी चौकशी केली असता ट्र्ँक्टर चालकाकडे रेती उपसा करून वाहतुक करण्याची कोणत्याही प्रकारची शासन परवानगी नव्हती. त्यामुळे पोलीसांनी ट्र्ँक्टर क्रमांक एमएच-३४-एल-६८८७ व एमएच-३४-एल-७८३५ ट्रालीसह ताब्यात घेवुन चालक सुधीर उमाजी मोहुर्ले (३३) रा. गडीसुर्ला व तल्लीन संजय वाढई (२३) रा. बेंबाळ यांचे विरूध्द कलम ३७९, ५११, ३४ अन्वये गुन्हा नोंदवुन अटक केली.
पोलीसांनी भेजगांव नदीघाटावर धाड मारून चालकासह ट्र्ँक्टर ताब्यात घेतल्याची माहीती होताच तालुक्यातील दहेगांव, चिचाळा, हळदी व येरगांव नदीघाटावरून अवैद्य रेती उपसा करणाऱ्यांनी पळ काढल्याने त्या घाटावर शुकशुकाट दिसुन आला.