कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुल येथे आक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करावे तालुका कांग्रेस कमिटीच्या मागणीला नाम.पालकमंत्री यांची तात्काळ मंजुरी

22

मुल- मुल तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती पाझिटिव्ही रुग्ण संख्या, आणि मृत्यूच्या प्रमाणातही होत असलेली वाढ ही पुढे रुद्ररूप धारण करू नये, व मुल तालुक्यातील कोरोना रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध व्हावे करीता तालुक्याच्या ठिकाणी कोविड-१९ सेंटर देऊन आक्सिजन आणि डॉकट्टर,नर्स,कर्मचारी त्वरित उपलब्ध करुन घ्यावे अशा स्वरूपाची मागणी मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे नेतृत्वात शासनाचे मदत व पुनर्वसन मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांचेकडे आजच एका लेखी निवेदनाद्वारे केली असता नाम.पालकमंत्री यांनी मुल येथे तात्काळ आक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी प्रदान केली असल्याचे पत्र त्वरित चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व तालूका कांग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावार यांना सुपूर्द केले आहे. मुल येथे ५० आक्सिजन पाइंटची अतिरीक्त मागणी पालकमंत्री महोदयांनी मंजूर केल्याने मुल तालुक्यातील कोरोना पझिटिव्ह रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल याबद्दल नाम. पालकमंत्री यांनी कांग्रेस कमिटीने केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेतल्याबद्दल पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांचे कांग्रेस कमिटीच्या वगीने व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व तालुका कांग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, पदाधिकारी राकेश रत्नावार यांनी मुल तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानले आहे.