जूनासूर्ला येथे कोविड लसीकरण केंदा्चा सभापती श्री चंदू भाऊ मारगोनवार यांच्या हस्ते उद्घाटन

56

जूनासूर्ला येथे कोविड लसीकरण केंदा्चा सभापती श्री चंदू भाऊ मारगोनवार यांच्या हस्ते उद्घाटन

मूल :- नजीक असलेल्या जूनासूर्ला गावातील व  परीसरातील 45 वर्षाच्या वरील नागरिकांना कोविडची लस उपलब्ध व्हावी,यासाठी सभापती   श्री चंदू भाऊ मारगोनवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पाडले.

यावेळी पंचायत समिती सभापती नी बोलताना ,सर्वांनी कोरोना या महामारीवर कसा आळा घालता येईल यासाठी प्रयत्न करावे, कोरोना या रोगाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

 

व सतत मास्क सॅनिटाइजर चा वापर करावा. अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. जुनासूर्ला ग्रामपंचायत मध्ये आजपासून कोविड लसीकरण केंन्द्र सुरू झाल्याने

गावातील व नजीकच्या  परिसरातील  45 वर्षाच्या वरील  नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी उपस्थित ग्राम पंचायत जूनासूर्ला येथील सरपंच रंजीतभाऊ समर्थ , खुशालभाऊ टेकाम उपसरपंच,रामटेके साहेब ग्रामविस्तार अधिकारी,राजुभाऊ गोवर्धन गा्रमपंचायत सदस्य,शिल्पाताई पेरकीवार गा्रमपंचायत सदस्य,कर्रे तलाठी साहेब जुनासूर्ला, शेंन्डे सर मुख्याध्यापक जुनासूर्ला,गणेशभाऊ खोब्रागडे ग्रामपंचायत सदस्य व जेष्ठ नागरीक व इतर उपस्थित होते.