झाडीबोली साहित्य मंडळाची जिल्हा महिला कार्यकारिणी गठित मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर अध्यक्ष  यांची सर्वानुमते निवड  

43

झाडीबोली साहित्य मंडळाची जिल्हा महिला कार्यकारिणी गठित   

मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर  अध्यक्ष  यांची सर्वानुमते निवड          

चंद्रपूर : पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिला साहित्यिकांनी या भागात बोलली जाणारी बोलीभाषा अवगत करून या बोलीभाषेतून लेखन व्हावे आणि या भाषेचे संवर्धन व्हावे, या दृष्टिकोनातून झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्­यांनी आभासी प्रणालीद्वारे चर्चा करून जिल्हा महिला समिती गठित करण्यात आली.

यामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री तथा मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर यांची अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष म्हणून ॲड.सारिका जेनेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष अर्जूमन शेख बल्लारपूर, सविता सातपुते- कोट्टी चंद्रपूर, सचिव अरूणा जांभुळकर गोंडपिपरी, सहसचिव वृंदा पगडपल्लीवार मूल, संगिता बांबोळे गोंडपिपरी, भावना खोब्रागडे सिंदेवाही, संघटक शितल कर्णेवार देवाडा, मंजुषा दरवरे उर्जाग्राम, लिना भुसारी चिमूर, वंदना राऊत घुग्घूूस, अश्वीनी रोकडे चिमूर यांची निवड केंद्रीय मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. सर्व निवड झालेल्या महिला साहित्यिक मंडळींचे झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रा.डॉ. धनराज खानोरकर, अरूण झगडकर यांनी स्वागत केले.