अन्न पदार्थांचे वार्षीक विवरणपत्र ऑनलाइन सादर करणे बंधनकारक

34
अन्न पदार्थांचे वार्षीक विवरणपत्र ऑनलाइन सादर करणे बंधनकारक
चंद्रपूर दि. 8 एप्रिल : जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायीकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या खालील नियमन 2011 मधील प्रकरण क्रमांक 2 मधील तरतुदीनुसार आपल्या उत्पादन संस्थेत उत्पादीत केलेल्या अन्न पदार्थांचे वार्षीक विवरणपत्र 31 मे 2021 पुर्वी www.foscos.fssai.gov.in या वेबसाईटवर सादर करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. दि. 31 मे 2021 पुर्वी सदरचे विवरणपत्र सादर न केल्यास प्रतिदिवस रु. 100/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल.
तरी सर्व अन्नपदार्थ उत्पादक/रिपॅकर अन्न व्यवसायीकांनी अन्न पदार्थांचे वार्षीक विवरणपत्र फॉर्म-डी-1 ऑनलाइन सादर करणे बाबत नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी कळविले आहे.