मातीचे भांडे आणि मूर्ती व्यवसायासाठी नगर पालिकेने दुकान गाळे दयावे – गृहिणी महिला बचत गटाची मागणी

30

मातीचे भांडे आणि मूर्ती व्यवसायासाठी नगर पालिकेने दुकान गाळे दयावे – गृहिणी महिला बचत गटाची मागणी

मूल (विनायक रेकलवार):- बचत गटाच्या माध्यमातून मातीची भांडे आणि मूर्ती व्यवसाय चालविल्या जाते.त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवण्यासाठी नगर पालिकेने एखादे गाळे उपलब्ध करून दयावे अशी मागणी गृहिणी महिला बचत गटाच्या महिलांनी केली आहे.

बचत गटाचा नुकताच दहावा वर्धापन दिन येथील कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात साजरा करण्यात आला.त्यावेळी त्यांनी ही मागणी पालिकेकडे केली.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर या होत्या.प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक मडावी,वाळके,सहायक प्रकल्प अधिकारी रितेश भोयर,महिला बालकल्याण सभापती मांदाडे,नगरसेविका फुलझेले,वाकडे,मैत्रिणच्या देऊळवार,उपस्थित होते.

गृहिणींच्या वतीने नगराध्यक्षा रत्नमाला भोयर ,व्यवस्थापक मडावी,रितेश भोयर,ताराबाई वानी आणि धनराज वानी यांचा शाल श्रिफळ देवून सत्कार करण्यात आला. गृहिणी महिला बचत गटाच्या माध्यमातून मातीची भांडी आणि मूर्तीचा व्यवसाय केला जातो.

या व्यवसायातून महिलांना रोजगार मिळाला आहे.बचत गटाने आपला हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे.परंतु या व्यवसायाला अधिक बाजारपेठ मिळावा यासाठी नगर पालिकेने आपल्या अधिकार क्षेत्रातून पालिका अंतर्गत असलेल्या बाजारपेठेतील एखादे दुकान गाळे मिळवून दयावे अशी मागणी यावेळी गृहिणींनी वर्धापन दिनाच्या माध्यमातून नगराध्यक्षा यांच्या कडे केली.

कार्यक्रमाचे संचालन नलिनी आडपवार यानी तर प्रास्ताविक मंदा चल्लावार यांनी केले.आभार प्रदर्शन उज्वला खोब्रागडे यानी मानले.यावेळी गृहिणी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.