मूल तालुक्यातील मारोडा ग्राम पंचायतीचे भोयर यांची आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराकरीता निवड

26
  • मूल तालुक्यातील मारोडा ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी विलास बालाजी भोयर यांची शासनाच्या ग्राम विकास विभागाने चंद्रपूर जिल्हा परीषद अंतर्गत आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणुन निवड केली आहे.             मूल (प्रतिनिधी)
    तालुक्यातील मारोडा ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी विलास बालाजी भोयर यांची शासनाकडून दिल्या जाणाऱ्या जिल्हा परीषद स्तरावरील अतिउत्कृष्ठ काम करणारे ग्रामविकास अधिकारी पुरस्काराकरीता निवड झाली आहे.
    स्वच्छ आणि निर्मल ग्राम योजने अंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबवुन प्रत्येक गांव आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आणि सुदृढ करण्यासाठी शासन विविध पुरस्कार योजना राबवुन अधिकाऱ्यांसोबतच ग्राम पंचायतीचा सन्मान करीत असते. जिल्हा परीषद स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उत्साह वाढावा म्हणुन शासनाने ग्राम सेवक संघटनेच्या मागणीनुसार मागील काही वर्षापासुन आदर्श ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी पुरस्कार योजना राबावित आहे. या योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये झालेल्या मुल्यमापनाच्या आधारे मूल तालुक्यातील मारोडा ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी विलास बालाजी भोयर यांची शासनाच्या ग्राम विकास विभागाने चंद्रपूर जिल्हा परीषद अंतर्गत आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणुन निवड केली आहे. आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणुन निवड झालेल्या विलास भोयर यांना यापुर्वी २००९ मध्ये जिल्हा परीषदेने आदर्श ग्रामसेवक म्हणुन सन्मानित केले होते. गोंडपिपरी येथील रहीवाशी असलेले विलास भोयर यांनी २७ वर्षाच्या सेवाकाळात आजपर्यंत राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी आणि मूल तालुक्यात कर्तव्य पार पाडले आहे. मागील चार वर्षापासुन मारोडा ग्राम पंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणुन सेवारत असतांना २०१७ मध्ये मारोडा ग्राम पंचायतीला निर्मल ग्राम अभियानाचा पुरस्कार मिळवुन देण्यात विलास भोयर यांची मोलाची कामगिरी राहीली आहे.ग्रामपंचायत मारोडा चे गा्रम विकास अधिकारी श्री विलास बालाजी भोयर यांचे राज्यस्तरीय अतिउत्कृष्ठ कामकरणा-या आदर्श ग्रामविकास अधिकारी पंचायत राज अभियान पुरस्कारात जिल्हातुन एकमेव निवड झाल्याबदल त्यांचेमारोडा ग्रामपंचायत कमेटी कर्मचारी वृंद व गावकरी नागरीक यांचे वतिने गौरवास्पद अभिनंदन करण्यात आले.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भोयर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील  कलोडे, संवर्ग विकास अधिकारी डाँ. मयुर कळसे आणि ग्राम विस्तार अधिकारी प्रधान व पुप्पलवार यांचे आभार मानले आहे.

केद्र शासनाच्या पंचायत राज मंञालयाच्या वतीने जाहीर झालेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२१ करीता मारोडा ग्राम                              पंचायतीला पंडीत दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाच्या वतीने घेण्यात येणा-या                           पुरस्कार वितरण समारंभात ग्राम पंचायत आणि ग्राम विकास अधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.