Age Nationality And Domicile.| वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.

113

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र शासकीय योजनेसाठी किंवा शैक्षणिक कामासाठी अत्यंत गरजेचा प्रमाणपत्र आहे. सध्या हे प्रमाणपत्र मिळवणे खूप सोपे झाले असून त्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ऑनलाइन पद्धतीनेच प्रमाणपत्र मिळवता येईल त्यासाठी आपल्याकडे पुरेशी कागदपत्रे असल्यास आपण सहजरीत्या प्रमाणपत्र मिळवता येते.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे.

ओळखीच्या पुराव्यासाठी खालील किमान एक कागदपत्रे जोडावी.
आधार कार्ड.
पॅन कार्ड.
मतदान ओळखपत्र.
आर एस बी वाय कार्ड.
रोजगार हमी जॉब कार्ड.
वाहन चालक अनुज्ञप्ती.
इत्यादी कागदपत्रे जोडता येतील.

पत्त्याच्या पुराव्यासाठी खालील किमान एक कागदपत्रे जोडावे.

वीज देयक ( लाईट बिल).
भाडे पावती.
शिधापत्रिका ( रेशन कार्ड).
दूरध्वनी देयक ( फोन बिल).
पाणी पट्टी पावती.
मालमत्ता कर पावती.
वाहन चालक अनुज्ञप्ती.
मालमत्ता नोंदणी उतारा.
सात बारा किंवा आठ अ चा उतारा.

वयाच्या पुराव्यासाठी खालील किमान अनेक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

जन्मदाखला.
बोनाफाईड प्रमाणपत्र.
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा.
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तिका.

रहिवासाचा पुरावा म्हणून खालील कागदपत्र पैकी किमान एक कागदपत्र जोडावे.

तलाठी यांनी दिलेला रहिवासी चा दाखला.
ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी चा दाखला.
रहिवाशी बाबतचा स्वयंघोषणापत्र.

इतर महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असल्यास जोडावे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
पतीचा रहिवासी दाखला.
वडील, आजोबा किंवा इतर रक्त संबंधातील नातेवाईकांचे शाळा सोडलेला दाखला.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्रासाठी मंजुरी कुठे मिळते आणि अपील कुठे करावे.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी मंजुरी माननीय तहसीलदार यांच्याकडून मिळते. प्रमाणपत्र मिळण्याची जास्तीत जास्त कालावधी 15 दिवसाची आहे. सर्व कागदपत्रे बरोबर जोडले असता एखाद्यावेळेस प्रमाणपत्रात मंजुरी देण्यास विलंब झाल्यास किंवा अर्ज नामंजूर झाल्यास किंवा रद्द झाल्यास. आपण संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पहिला अपील करू शकतो. त्यांच्याकडे देखील काही कारणास्तव प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्यास किंवा अर्ज नाकारल्यास किंवा रद्द झाल्यास आपण दुसरा अपील माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकतो.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी आपण आपले संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करावी. त्यानंतर आपल्याकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी. त्यामध्ये आपल्या जवळपास असलेला आपले सरकार सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयात असलेला सेतू केंद्र किंवा आपण घरबसल्या आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून आपण वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी अर्ज करू शकतो.
आपले सरकार सेवा केंद्र वर अर्ज करण्यासाठी किंवा शेतू केंद्रावर अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन जावी त्यानंतर त्या ठिकाणी आपला अर्ज भरला जाईल त्यानंतर आपल्याला एक पोच मिळेल ते आपण सांभाळून ठेवायची आहे. याउलट आपण कोठेही न जाता घर बसल्या आपले सरकार पोर्टल च्या माध्यमातून नागरिकाच्या लॉगिन मधून आपण वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी अर्ज करू शकतो.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय आहे?

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी अर्ज केल्यानंतर आपण आपले सरकार सेवा केंद्रातून करू द्या किंवा सेतू केंद्रातून करू द्या किंवा आपले सरकार पोर्टल च्या माध्यमातून करू द्या मात्र आपले अर्ज तहसील कार्यालयातील क्लासच्या टेबलला जाते. त्याठिकाणी तहसील मधील क्लार्क यांनी आपल्या अर्जाची पडताळणी करतात सर्व कागदपत्रे बरोबर असल्यास नायब तहसीलदार यांच्या टेबलला पाठवतात किंवा अर्जामधील कागदपत्रे काही तफावत असल्यास किंवा चुकीची असल्यास अर्ज माघारी पाठवला जातो.
त्यानंतर नायब तहसीलदार यांच्या टेबलला गेल्यानंतर त्यांनी क्लार्क कडून मिळालेल्या अर्जाची पडताळणी करून योग्य असल्यास तहसीलदार यांच्या टेबलला पाठवतात. त्यानंतर माननीय तहसीलदार यांच्या टेबलला आलेला आज त्यांनी अर्जाची पूर्ण पडताळणी करून सर्व कागदपत्र योग्य असल्यास प्रमाणपत्रासह मंजुरी देतात आणि डिजिटल स्वाक्षरी करतात.

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी मंजुरी मिळाल्यानंतर काय करावे?

वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर माननीय तहसीलदार यांच्याकडून डिजिटल स्वाक्षरी केले जाते त्यानंतर आपण ज्या माध्यमातून अर्ज केला आहे आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टल च्या माध्यमातून ठिकाणातून आपण अर्ज केले आहे त्या ठिकाणी आपल्याला आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल आणि त्याचे प्रिंट काढता येईल.त्यानंतर त्या ठिकाणाहून आपले प्रमाणपत्र आपल्याला घेता येईल.