होळी,रंगपंचमी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट खबरदारी,साध्या पध्दतीने सण साजरा करा

21

होळी,रंगपंचमी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट
खबरदारी,साध्या पध्दतीने सण साजरा करा

मूल:- कोरोना संसर्ग झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे घरीच राहा आणि सुरक्षित राहा,मूलमंत्र जपण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामूळे मोठया उत्साहात आणि त्यामुळे मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणारी होळी आणि रंगपंचमी यंदा
कोरोनाच्या सावटाखाली साजरी होणार आहे.नागरिकांनी एकत्र न येता घरच्या घरीच शिमगा साजारा करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुस-या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. बाधितांचा आकडा
वाढू लागला आहे. संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखली जात आहे. त्याचाच एक भाग
म्हणून गर्दी जमवून सण समारंभ साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. गर्दी करणारे सण समारंभ साधेपणाने घरच्या घरी
साजरे करण्यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करत आहे..
गर्दी जमून यावर तसेच मास्क न वापरण्या-यांवर कारवाईचा बडगा उभारत आहेत. नागरिक मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने
पाहत नसल्याने संसर्ग वाढू लागला आहे. होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. जास्तीत जास्त मोठी होळी पेटविण्यासाठी गावागावांत विविध मंडळांची चढाओढ लागते. लाकडे,गोव-या गोळा केल्या जातात. अनेक जण तर होळीसाठी गाव-या वाटपाचा उपक्रम राबवितात. गावात काही ठराविक ठिकाणी मोठी होळी पेटविण्यात येते. त्या परिसरात सर्व नागरीक एकत्र येऊन होळीला नैवेद्य दाखवतात. नारळ अर्पण करून शिमाग साजरा करतात. परंतू,यावर्षी होळीवर कोरोनाचे सावट घोंगावत आहे.
घराबाहेर पडताना संसर्गाची धास्ती वाढत आहे. त्यामुळे होळी सर्वप्रथम परंपरेनुसार घरच्या घरी साजरी करणे गरजेचे आहे. घरोघरी प्रतिकात्मक होळी पेटवून पूजन केले जाणार आहे. परंतु यावर्षी होळीवर कोरोना संसर्गाचा रंग चढल्याने रंगपंचमीवरही मर्यादा आल्या आहेत.