बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती (Bank of Maharashtra Recruitment 2021): नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. जनरलिस्ट ऑफिसर स्केल II (Generalist Officers scale II) या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. (Bank of Maharashtra Recruitment 2021 apply online for Generalist Officers scale II post on bankofmaharashtra.in)
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – २२ मार्च २०२१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२१
- अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख – २१ एप्रिल २०२१
- ऑनलाईन फी भरण्याची तारीख – २२ मार्च २०२१ ते ६ एप्रिल २०२१
पदांचा तपशिल
- पदाचे नाव – जनरलिस्ट ऑफिसर स्केल II
- एकूण पदांची संख्या – १५० (एससी प्रवर्ग – २२, एसटी प्रवर्ग – ११, ओबीसी – ४०, ईडब्ल्यूएस – १५, अनारक्षित पदांची संख्या – ६२)
- वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत)
- शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान ६० टक्क्यांसह उत्तीर्ण असलेली पदवी आवश्यक. (SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी ५५%) JAIB आणि CAIIB उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ, शैक्षणिक संस्था / बोर्ड / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम सारखे शैक्षणिक कोर्स.
- अनुभव – शिक्षण पूर्ण झाल्यावर शेड्युल्ड कमर्शिअल बँकेत तीन वर्षे अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभव.
पगार किती?
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत घेतल्यानंतर देण्यात येणारा पगार – ४८१७० – (१७४०/१) – ४९९१० – (१९९०/१०) – ६९८१०.
या भरती प्रक्रिये संदर्भातील सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर जाहिरात वाचल्यानंतरच इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा.
जाहिरात क्र.: AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II/Project II/2020-21
Total: 150 जागा
पदाचे नाव: जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II)
SC | ST | OBC | EWS | UR | Total |
22 | 11 | 40 | 15 | 62 | 150 |
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2021