स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी 31 मार्च अंतिम मुदत
मूल:- विविध प्रकारच्या सवलत धारकांाना कोरोनामुळे बंद करण्यात
आलेली सवलत महामंडळाकडून पुन्हा देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.यामुळे
लाभाथ्र्यांना प्रवासात सवलत मिळणार असून,दुसरीकडे स्मार्ट कार्ड सक्तीचे
करण्यात आल्यामुळे संबंधित लाभाथ्र्यांनी 31 मार्च 2021 पर्यंत स्मार्ट कार्डची नोंदणी
करणे बंधनकारकही करण्यात आले आहे.
राज्य परीवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,बंाधव,विविध शासकीय पुरस्कार प्राप्त,यासह इतर लाभाथ्र्यांना प्रवासात सवलत देण्यात येते. मात्र,यंदाकोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत बंद करण्यात आली हेाती.यामुळे सवलत धारकांना काही महिने खाजगी वाहनांनी जादा पैसे मोजून प्रवास करावा
लागला. मात्र,आता राज्य शासनाने ही बंदी उठवून,सवलत धारकांनाी बसमधुन प्रवास करण्याला
परवानगी दिली आहे.यामुळे संबधित लाभाथ्र्यांना दिलासा मिळाला असून,बसमधुन सवलतीत प्रवास करता येणार
आहे.विशेष म्हणजे या लाभार्थंांना शिवशाही या वातानुकूलीत बस मधूनही प्रवासासाठी परवानगी
मिळाली आहे.तर स्मार्टकार्डसाठी 31 मार्च अंतिम मुदतमहामंडळातर्फे बनावट पास तयार सवलतींचा लाभ घेण्याचे प्रकार निदर्शनास आले होते.या प्रकाराला आळा घालण्यासाठी महामंडळातर्फे सर्व लाभाथ्र्यांना 31 मार्च 2021 पर्यंत स्मार्टकार्ड
नोंदणी बंधनकरक केले आहे. त्यानंतर ज्या लाभार्थीकडे स्मार्टकार्ड नाही अशा प्रवासात मनाई
करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.