महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत कृषी पंप धारकांना जास्तीत जास्त फायदे पोहचविण्याच्या दृष्टीने व जनजागृती करण्यासाठी स.व.सु उपविभाग महावितरण तर्फे बाॅईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

53

मूल :- आज दिनांक 17/03/2021 रोजी बुधवार ला महाकृषी ऊर्जा पर्व अंतर्गत कृषी पंप धारकांना जास्तीत जास्त
फायदे पोहचविण्याच्या दृष्टीने व जनजागृती करण्यासाठी स.व.सु उपविभाग महावितरण तर्फे बाॅईक रॅलीचे आयोजन
करण्यात आले.

या अंतर्गत कृषी पंप धोरण -2020 नुसार कृषी धारकांना 31मार्च 2022पर्यंत विज बिल भरणा केल्यास  सप्टेंबर 2020 च्या थकबाकीदार सरसकट 50टक्के विज बिल माफ करण्यात येत आहे. तसेच मूल उपविभागा अंतर्गत
520 कृषी पंप धारकांनी या योजनेचा फायदा घेऊन जवळपास 36 लाखाचा भरणा करून या योजनेचा फायदा घेतला आहे.
तरी अधिकाअधिक कृषि धारकांनी या येाजनेचा विनाविलंब फायदा घ्यावा असे आवाहन महावितरणाच्या या रॅली तर्फे
करण्यात आले. सदर रॅली मध्ये प्रमूख पाहूणे मा.नंदूभाऊ रणदिवे उपाध्यक्ष नगरपरीषद मूल व महावितरण विभागीय अधिकारी
श्री उदयकुमार फरासखानेवाला यांनी हिरवी झेंडी दाखवून बाॅईक रॅलीचे उदघाटन केले.
सदर रॅली मध्ये मूल उपविभागीय कार्यालयातील अभियंते,सर्व जनमित्रे व तसेच सर्व कर्मचा-यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला