व्यापारी वर्गांनी कोरोना तपासणी करावी उपविभागिय अधिकारी महादेव खेडकर यांचे आवाहन

44

व्यापारी वर्गांनी कोरोना तपासणी करावी उप विभागिय अधिकारी महादेव खेडकर यांचे आवाहन                                                             मूल– दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायीकांनी तातडीने त्यांची  कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उप विभागिय अधिकारी महादेव खेडकर यांनी केले.
सद्यपरिस्थित कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर आळा घालण्यासाठी मूल च्या सर्व व्यापारी बंधुंनी कोरोना टेस्ट करण्याचे आव्हान उप विभागिय अधिकारी , तहसिलदार आणि मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आले.

या बैठकीत मूल येथील सर्व व्यापारी सघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तपासणीमुळे कोरोना आजाराचे लवकर निदान झाल्यास संभाव्य धोका टाळता येईल, तसेच कोरोनाचा फैलावदेखील रोखता येईल, त्यामुळे    व्यापारी वर्गांनी    कोरोनाची तपासणी तातडीने करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, लग्न व इतर सामुहिक समारंभाच्या ठिकाणी नियंत्रित संख्या ठेवणे, कोरोनासंदर्भातील लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदीबाबत व्यापारी वर्गांनी व्यापारी वर्गासोबत त्यांच्या प्रतिष्ठानात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी सुध्दा ही टेस्ट करावी, असे सांगण्यात आले.

मागिल काळात कोरोना च्या संसंर्गापासुन वाचविण्यासाठी व्यापारी बंधुंनी मोलाचे सहकार्य केले याबाबत बैठकीत विशेष उल्लेख करण्यात आला. असेच सहकार्य नेहमी मिळावे, ही भावना व्यक्त करण्यात आली.