माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी कार्यशाळा तालुका प्रशासन आणि नगरपालिका मुलच्या वतीने येथील कन्नमवार सभागृहात

65

तालुका प्रशासन आणि नगरपालिका मुलच्या वतीने येथील कन्नमवार सभागृहात आयोजित
माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी या संवाद सभा

कोरोनामुक्तीसाठी सर्व घटकाकडून प्रयत्न आवश्यक: अजय गुल्हाने
मूल:- कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये,यासाठी जास्तीत जास्त
रूग्णांची कोरोना तपासणी केली जात आहे. यासाठी नागरिकांनाी
स्वतःपुढाकार घेणे आवश्यक आहे.आस्थापन धारकांनी आपल्या आस्थापनेत
कार्यरत कर्मचा-यांना तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
मास्क,सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखूनच आपले काम करावे,‘माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी‘
या अभियानांतर्गत आपले कार्यक्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,असे मत
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.
तालुका प्रशासन आणि नगरपालिका मुलच्या वतीने येथील कन्नमवार सभागृहात आयोजित
माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी या संवाद सभा दरम्यान ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले,मूलचे उपविभागीय
अधिकारी महादेव खेडकर,मूलचे तहसीलदार डाॅ.रविद्र होळी,मुलचे मुख्यधिकारी सिध्दार्थ मेश्राम ,पोंभूर्णाचे तहसीलदार डाॅ.निलेश खलके,
मूलचे पोलीस निरीक्षक सतिषसिंह राजपूत,पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम,मूल नगरपालिकेचे
उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हयात मोठया प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
60 वर्षावरील नागरिकांनी अॅपवर नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा. अफवांवर विश्वासू
ठेवू नये. अतिशय सुरक्षितपणे लसीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांनी लसीकरण
करून घ्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांवी यावेळी केले.
संचालन मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी केले.यावेळी मूल आणि पोंभूर्णा तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.