मास्कच्या कारवाईत 50 हजाराचा दंड वसुल

49

मास्कच्या कारवाईत 50 हजाराचा दंड वसुल,
कार्यवाईत शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश

मूल :-  कोरोना संसर्ग वाढत असतांनाही नागरीकांकडून पाहिजे त्याप्रमाणात कोरोना नियमाचे पालन केल्या जात नसल्याने मूल शहरातील शतकाच्यावर नागरीकांवर आठ दिवसात त्यांच्याकडून 50 हजार रूपयाचे दंड वसुल करण्यात आले आहे.
मूल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरीकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, त्यासोबतच नागरीकांनी गर्दी करू नये व शारीरिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते मात्र नागरीकांनी गर्दीत असतानाही मास्कचा वापर करीत नव्हते, यामुळे नगर पालीकेने 25 फेब्रुवारी रोजी वेगवेगळे 10 पथक तयार केले, यापथकाच्या माध्यमातुन मूल शहरात फिरून 60 नागरीकांवर एकाच दिवशी कारवाई केली असून त्यांच्याकडून 30 हजार रूपये दंड वसुल केला आहे. या कार्यवाहीत सामान्य नागरिकांसोबत शासकीय कार्यालये,संस्था सारख्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर सुद्धा कार्यवाई करण्यात आली.
मूलचे तहसीलदार डाॅ. रविंद्र होळी, मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालीकेचे प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे, विलास कागदेलवार, अशोक बाबर,भुरसे, सुजित जोगे, प्रतीक डोंगे यांनी कारवाई केली.