मुल येथे व्हिडिओग्रॉफी कार्यशाळा
छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तसेच मुल तालुका छायाचित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुल येथे शिका, संघटीत व्हा हा विचार घेवून एक नवी दिशा, नविन विचार, या तत्वावर शुक्रवारला जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द मेंटर रामकृष्ण सुर्वे नांदेड हे उपस्थित छायाचित्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत डिएसएलआर वेडिंग हायलाईट्ससाठी टिप्स, व्हिडिओ कॅमेरा बेसिक, विवाह प्रसंगातील महत्वाचे बारकावे, हायलाईट टिझरसाठी शुट, वेडिंग स्टोरी एक नवीन संकल्पना, व्हिडिओ एडीटसाठी शुटची पुर्व तयारी, व्हिडिओ कॅमेरतील महत्वाचे बारकावे, कलर करेक्शन, प्रिसेट, कॅमेरा इफेक्ट, प्रॅक्टिकल शुट सहज व सोप्या भाषेत व्यवसायासमंधित प्रश्नोत्तरे यासारखे अनेक विषय हाताळले जाणार आहे.
मुल येथील मा. सा. कन्नमवार सभागृह, प्रशासकीय भवन जवळ मुल येथे शुक्रवार १९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यशाळा राहणार असून जिल्हाभरातून या कार्यक्रमास ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे.
इच्छुक छायाचित्रकारांनी www.chandrapurphotografar.org.in/page-3794051 या साईटवर नोंदणी करावी. अधिक माहिती तसेच नोंदणीसाठी फुलचंद मेश्राम चंद्रपूर, केशिप पाटील ब्रम्हपुरी, रुपेश कोठारे मुल, रवी शेंडे नागभीड यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे यांनी केले आहे.