प्रेम व्यक्त करणा—या प्रत्येकाकरिता आठवडाभर उत्सव

45

प्रेम व्यक्त करणा—या प्रत्येकाकरिता आठवडाभर उत्सव

मूल :— आधुनिक युगात तरूण पिढीने ‘व्हॅलेटाईन डे’ ला केवळ प्रेयसीपुरतेच मर्यादित केले आहे. आता 7 फे्ब्रवारीपासून व्हॅलेंटाइन डेच्या विविध दिनविशेषांना सुरूवात होणार आहे. सदर उत्सव आठवडाभर राहणार आहे.यासाठी भेटवस्तूंनी दुकाने सजले आहेत.
संत व्हॅलेंटाईन हे रोमन कॅथलिक पंथीय होते. या अतिशय प्रेमळ संताच्या नावावर व्हॅलेंटाईन डे हा उत्सवच जगभर साजरा केला जातो. मुळात प्रेम हे फक्त प्रेयसीवरच केले जात नाही. आपल्या सर्वांची हुदयस्थ व्यक्ती ही आई,वडील,भाऊ,बहीण,चिमुकली मुले,मुली किंवा पाळीव प्राणी सुध्दा हेाते.
संशोधनानसुार,प्रेम एक भावना आहे आणि ती व्यक्तीला भावना प्रकट झालीच पाहिजे. म्हणून आपल्याला जी व्यक्ती आवडते किंवा ज्या व्यक्तीवर खुप प्रेम आहे,अशांना आपले हावभाव सांगून मन मोकळे केले पाहिजे.असे संशोधनातून आढळून आले आहे. प्रेमाचा उत्सव म्हटले की,आपली कान टवकारले असतील,यात शंकाच नाही. बहुतांश तरूणांच्या कायम आठवणीत राहणारा उत्सव फेब्रवारी महिन्यात येतो. त्यातील अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे 14 फेब्रवारी ”व्हॅलेंटाइन डे ” प्रेमाचा उत्सवाचा दिवस आहे.
आज पाशात्य देशात प्रेम प्रकट करण्याचे उपक्रम आवर्जूून साजरे केले जातात. त्याच ताकदीने व उत्साहाने व्हॅलेंटाईन वीक आपल्या देशातही आता साजरा होऊ लागला आहे.
7 फब्रूवारीला रोज डे
8 ला प्रपोज डे
9 ला चॉकलेट डे
10 ला टेडी डे
11 ला प्रॉमिस डे
12 ला किस डे
13 ला हग डे
14 ला व्हॅलेंटाईन डे असे आठवडाभर प्रेमीयुगुलांसाठीच नव्हे,तर विविध लोकांवर प्रेम करण्यासाठी या दिवसाचे वेगळे महत्व आहे. त्यानिमित्य तरूणाईत तयारी सुरू झाली आहे.