ज्ञानेश्वर गुरनुले यांच्या घरी नळाच्या पाण्यात नारू 

27

 

मुल :-      सुंदर शहर मुल शहर म्हणून ओळखल्या जाणार्या मूल शहरातील नागरिक आता आरोग्याच्या दृष्टीने आजारी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्याला करणही तसेच आहे. 28 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कारण  वॉर्ड नंबर 15 (बेघर वस्तीतील) नागरिक ज्ञानेश्वर गुरनुले यांच्या घरी आज सकाळी 7.30 वाजता नियमितपणे नळाचे पिण्याचे पाणी पाण्यात  सहा ते सात इंच लांबीचा अतिशय सूक्ष्म बारीक नारू गुंडातील पाण्यात फिरतांना आढळून आला आहे.त्यामुळे  नारू निघालेले पाणी कसे प्यावे ?असा प्रश्न निर्माण झाला असून जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

मूल  नगर परिषदेने सध्या स्तिथीत सकाळी आणि संध्याकाळी वॉर्ड नंबर 14 व 15 मध्ये दोन्ही वेळेला पिण्याचे पाणी सोडत आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यामुळे वॉर्डातील जनता समाधानी आहे.परंतु पाण्यात नारू सारखे जंतू निघणे ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे करिता नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने व न.प.पदाधिकारी यांनी त्वरित लक्ष पुरवून जनतेला स्वछ व निर्जंतुक पिण्याचे पाणी पाजावे अशी मागणी वॉर्ड नंबर 14 व 15 च्या नागरिकांनी केली आहे