अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाने केला कोरोना योध्दा म्हणुन सन्मान
मूल (प्रतिनिधी)
कोरोना प्रादुर्भावाच्या संकट काळात अतुलनीय कार्ये करून शासनाला सहकार्य व समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी कोरोना योध्दा म्हणुन सन्मानीत करण्यात आले.
ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांचे हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सुमेध खोब्रागडे, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाँ. उज्वल इंदोरकर, डाँ. तिरथ उराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, मनोज गदादे, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड, डाँ. पुर्वा तारे, प्रा. निखील दहीवले, नायब तहसिलदार यशवंत पवार, पृथ्वीराज साधनकर, प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, राजोली येथील पोलीस पाटील गोपाल ठिकरे, भेजगांव येथील पोलीस पाटील शशीकांत गणवीर यांचेसह
ग्रामीण भागात सेवा करणाऱ्या आशा स्वयंसेवीका श्रीमती कल्पना रायपुरे, रेखा बोरकुटे, अर्चना मुरकुटे, वनिता मुनगेलवार, रिना चुनारकर आणि सुषमा येनगंटीवार यांना कोरोना योध्दा म्हणुन सन्मानपञ देण्यात आले. यावेळी तहसिलदार डाँ. रविंद्र होळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दिलीप गेडाम यांनी केले.