महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मा.सा.कन्नमवार यांची 121 जयंती त्यांची कर्मभूमी समजल्या जाणाऱ्या मुल शहरात मोठ्या उत्साहात साजरी.

51

मूल :—  महाराष्ट्राचे दुसरे आणि विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय मा.सा. कन्नमवार यांची 121 वी जयंती मुल शहरात बेलदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुल च्या वतीने साजरी करण्यात आली. सकाळच्या सुमारास स्वर्गीय मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह येथील पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून बेलदार समाज बांधव भगिनींनी साजरा केला. त्यानंतर अकरा वाजता पासून तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात असंख्य रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.

यावेळी समाजातील ज्येष्ठ शंकर आकुलवार, अरुण मुद्देशवार, समाजाचे अध्यक्ष डॉ. सुभाष रेड्डीवार, सचिव अशोक मैदमवार, कोषाध्यक्ष प्राद्या. मारोतराव पुल्लावार, संदीप कारमवार, राजेंद्र कन्नमवार तसेच युवा वर्ग, समाज बांधव- भगिनी उपस्थित होते.