ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरण्यासाठी जागरण अर्ज स्वीकारण्याची अंतीम मुदत 30 डिसेंबर

51

ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरण्यासाठी जागरण
अर्ज स्वीकारण्याची अंतीम मुदत 30 डिसेंबर
मूल (प्रमोद मशाखेत्री) निवांतपणे उमेदवारी अर्ज दाखल करता यावा तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची साईट थोडी अधिक गतिने चालत असते. त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी भाऊ,सर फार्म आॅनलाईन भरायला रात्रीच येवू का गा,असा प्रश्न महाआॅनलाईन केंन्द्राला विचारीत आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. थंडी पडू लागली आहे. थंडीत निवडणुकीचे गरम वारे वाहत आहेत.उमेदवारास जोश आलेला आहे. याचा प्रत्यय येत आहे. निवडणूक अर्ज आॅनलाईन दाखल करण्यासाठी सगळेच त्या साईटवर बसून आहेत.
त्यामुळे दिवसाला ती साईट संथगतीने चालत असते अशी ओरड आहे.
दिवसभर आॅनलाईन सेंन्टर मध्ये एकाजागी बसून गाव पुढारी कंटाळलेले असतात. भाऊ,रात्री नेट व साईट जोरात चालते काय असे मनस्थाप करून नेट कॅफेच्या मालकांना विचारतात. तेही त्यांच्या बोलण्याला हो देत या ना रात्री असे बोलून आपले दिवसा नित्याची कामे करतात.
गाव खेडयात असणारे गाव पुढारी सामान्यत: शेतकरी असतात. तेही आपली शेतातली व घरची कामे उरकुन सवडीने तालुक्यात येतात. आपल्या सवंगडयाना सोबत घेवुन येतात. इथे मग छोटी पार्टीही केली जाते. रात्री उमेदवारी अर्ज भरण्यास निवांतपणा मिळतो. कारण बहुदा रात्रीला जाम असलेली ती साईट मोकळी होते. त्यामुळे पटापट अर्ज दाखल करण्यास मतद होते.
पॅनलचे अधिक उमेदवार असल्याने वेळ लागतो. त्यामुळे स्थानिक पुढारी थंडीत रात्रीचा जागरण करून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत.
आॅनलाईन अर्जदाखल करणे ही उमेदवारांची कसोटीच बघणे आहे. कधी साईट संथ,कधी नेटवर्कचा खोडा तसेच कागदपत्रांची जमवाजमव आदी भागगडीवर विजय मिळवून अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जात आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जात आहे. अर्ज दाखल करण्यासाठी बॅंकेचे नवीन खाते उघडणे,बॅंकेची पास बुक घेणे ही नवीनच वाढ उमेदवारांना लागली आहे.

ऑनलाइन उमेदवारी अर्ज २४ तास भरता येणार आहे. या अर्जासोबत ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला, उमेदवार ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचा, ग्रामसेवक यांचा दाखला, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र अथवा शौचालय वापराबाबत ग्रामसभेच्या ठरावासह प्रमाणपत्र, अपत्यांचे घोषणपत्र, (१२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य नसावे), निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक पासबुक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालेल, अनामत रक्कम भरल्याची पावती, मालमत्ता व दायित्व घोषणा पत्र, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याबाबत घोषणा पत्र, जात वैधता प्रमाण पत्र किंवा जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती असे दाखले, प्रमाणपत्र जोडून त्यावर आवश्यक तेथे सह्या करून सदर परिपूर्ण उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाचा आहे.

उमेदवारी दाखल करण्यास उमेदवारांना विविध दाखल्यांसाठी गरगर फिराव लागते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासुन ते नामनिर्देशन पत्र कायम राहण्यापर्यंत ताण सहन करावा लागतो. त्यांनतरचे दिवस त्यांच्या परीक्षेचा काळ राहतो. प्रत्येक उमेदवार त्या परीक्षेत पास (निवडूण येण्यासाठी) विविध आयुधांचा वापर करीत असतो. त्यानंतर प्रतीक्षा होत असते गुलाल उधळण करण्याची.