वाघाने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार

44

वाघाने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार
गडचिरोली प्रतिनिधी: जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गोगाव येथील महिला वाघाच्या हल्लात ठार झाल्याची घटना आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली. मंजुळाबाई बुधाजी चौधरी 62 असे वाघाच्या हल्लयात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मंजुळाबाई हया इतर 6 महिलासह आज सकाळच्या सुमारास गावानजीकच्या जंगलात सरपण जमा करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान दुपारी 1.30 वाजाताच्या सुमारास अचानक मंजुळाबाई यांच्यावर वाघाने हल्ला केला यावेळी सोबत असलेल्या माहिलांनी आरडाओरड केल्याने वाघ घटनास्थळावरून पसार झाला मात्र वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या मंजुळाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती महिलांनी लागलीच गावक—यांना देतात मृतक महिलेचे कुटुंब व गावक—यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभागाला देण्यात आली.