ग्रामपंचायतीने लोकन्यायालयाच्या माध्यमातून प्रकरणांचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )कपील कलोडे यांनी केले आहे.

64

मूल :— प्रत्येक तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये आयोजित केलेल्या राष्टीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयाने कर वसुलीत उच्चांक गाठला असून जिल्हयातील 122 ग्रामपंचायतीमधील 1441 प्रकरणात 26 लाख 31 हजार रूपये वसुली करण्यात आली असून 1091 प्रकरणातील थकीत करधारकांनी 29 लाख 17 हजार रूपये चार दिवसात ग्रामपंचायतीकडे जमा करण्याबाबत तडजोडनाम्यात माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत एकाचवेळी मोठया प्रमाणात थकीत कराचा भरणा झाल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामधील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये 12 डिसेंबर ला एकाच दिवशी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर वसुलीकरीता थकित असलेल्या करधारकांची प्रकरणे निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी मोठया प्रमाणात गावातील थकीत कर ग्रामपंचायतीला जमा केला.लोकन्यायालयाच्या या उपक्रमामुळे थकित करधारकांमध्ये भीती निर्माण झाल्याने न्यायालयाच्या नोटीसला त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
भविष्यात लोकन्यायालयाच्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये मोठया प्रमाणात थकित करधारकांविरूध्द प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. त्यामूळे ग्रामपंचायतीच्या उत्पनात वाढ होउुन अनेक विकास कामांना चालणा मिळेल व ग्रामस्थांनासाठी गावात मूलभूत सुविधा निर्माण होणे शक्य होईल. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीने लोकन्यायालयाच्या माध्यमातून अशाच प्रकारे प्रकरणांचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपील कलोडे यांनी केले आहे.