पदवी व पदव्युत्तर अभ्सासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ 15 डिसेंबर पर्यंत घेता येणार प्रवेश

36

पदवी व पदव्युत्तर अभ्सासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ 15 डिसेंबर पर्यंत घेता येणार प्रवेश

चंद्रपूर : कोरोनाजन्य परीस्थितीमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेत विद्याथ्र्याना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 15 डिसेंबर मुदतवाढ दिली आहे.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 12 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र कोरोना जन्य परीस्थिती असल्याने अनेक विद्यार्थी विद्यापीठ,महाविद्यालयापर्यंत वेळेत पोहचू शकले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती.त्यामुळे अने​क विद्याथ्र्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
तसेच गोंडवाना विद्यापीठाशी संलग्रीत असलेल्या अनेक ​महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
त्यामुळे 14 डिसेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाने पत्र काढून 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीही सुटयांच्या कारणांमुळे प्रवेश प्रक्रिेयेला वाढ देण्यात आली होती. आता पुन्हा वाढ दिल्याने पदवी व पदवीत्तर विभागातील विद्याथ्र्यांना दिलासा मिळाला आहे.