अशी आहेत आवश्यक कागदपत्रे :विद्यार्थी पालकासाठी माहिती प्रवेशाचे दाखले असे मिळावा
मूल :— औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वैद्यकीय,कृषी,अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थी तयारी लागले आहेत.त्यासाठी विविध दाखले व प्रमाणपत्राची गरज भासते.ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येऊ नये याकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती,प्रक्रिया कशी चालते.यांची माहिती विद्यार्थी आणि पालकांना उपलब्ध करून देत आहेत.
उत्पन्नाचा दाखला :— तलाठी दाखला,राशन कार्ड,मतदान कार्ड,किंवा आधार कार्ड.
नौकरी असल्यास फॉर्म नंबर 16 किंवा आय.टी.रिटर्न
अधिवास प्रमाणपत्र एज नॅशनेलीटी व डोमेशियल सर्टीफिकेट :— अर्जदाराचे टिसी.वडील,आजोबा,काका यांचे टिसी. जन्मदाखला,राशन कार्ड,घर टॉक्स पावती,रहिवासी दाखला व 1967,1990,1995 ची मतदान यादी किंवा मतदान कार्ड.
एस.टी.,एस.सी.,ओबीसी,एन.टी.कास्ट सर्टिफिकेट :— अर्जदाराचे टि.सी,वडील,आजोबा,यांचे टि.सी.,कास्ट सर्टीफिकेट,राशन कार्ड,घर टॉक्ट पावती,मतदान फोटो,रहीवासी दाखला व पुरावा (एस.सी.,एस.टी.,1950चा पुरावा. ओबीसी साठी 1967 व एन.टी साठी 1961
सेंट्रल कॉस्ट साठी सर्व कागदपत्रे व तीन वर्षाचे ईंन्कम सटिफिकेट लागेल.)घर कर आकारणी,शेतीचे अधिकार अभिलेख पंजी,कोतवाल बुकी जन्मनोंद नक्कल,शाळेचा दाखल खारीज रजिस्टर उतारा व इतर जाती विषयक महसुली पुरावे.
15 वर्षाचा रहिवासी पुरावा :— अर्जदाराची टिसी.वडील,आजोबा,काका यांचे टि.सी.कास्ट सटीफिकेट,जन्मदाखला,राशन कार्ड,घर टॉक्स पावती,मतदान फोटो,रहिवासी दाखला व 1990/1995 मतदान यादी
7/12 व 8 अ चा उतारा आॅनलाईन काढून मिळतात.
ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र :— सरकारी डॉ.सर्टिफिकेट. टिसी.आधार कार्ड,पॅन कार्ड,वोटींग कार्ड,टॅक्स पावती,राशन कार्ड
नॉन क्रिमेलेयर :— अर्जदाराचे टि.सी,वडील,आजोबा,यांचे टि.सी.,कास्ट सर्टीफिकेट,राशन कार्ड,घर टॉक्ट पावती,मतदान फोटो,रहीवासी दाखला व पुरावा (एस.सी.,एस.टी.,1950चा पुरावा. ओबीसी साठी 1967 व एन.टी साठी 1961. तीन वर्षाचे ईंन्कम सटिफिकेट लागेल.)घर कर आकारणी,शेतीचे अधिकार अभिलेख पंजी,कोतवाल बुकी जन्मनोंद नक्कल,शाळेचा दाखल खारीज रजिस्टर उतारा व इतर जाती विषयक महसुली पुरावे.
श्रावणबाळ/वृध्दापकाळ योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्र :—1) 65 किंवा त्यापेक्षा जास्त वय 2)बीपीएल दाखला अथवा
21000/रूपये उत्पनाचे दाखला 3) वयाचा दाखला /वैदयकिय अधिकारी 4) रहीवासी दाखला 5)राशनकार्डची झेरॉक्स 6)आधार /मतदान ओळखपत्राची झेरॉक्स7) घरटॉक्स पावती 8) तलाठी दाखला 9) मतदान कार्ड (ओंटींग कार्ड)
या दाखल्यासाठी महा ई — सेवा केंद्र आणि आपले सरकार या पोर्टलव्दारे आॅनलाईन अर्ज करता येतो.अर्जाची पोच पावती ताबडतोब घ्यावी. अर्ज केल्यानंतर संबधित अधिकारी,नायब तहसीलदार,तहसीलदार,प्रांत कार्यालयातील कार्यवाही पूर्ण केल्या जाते.त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर महा ई सेवा केंद्रातून अर्जदाराला दाखला मिळतो.