Home आपला जिल्हा Breaking News ताडोबा अभयारण्यात भयंकर अपघात १२ वर्षीय मुलीचे अपघातात जागीच मृत्यू तर ४०...

ताडोबा अभयारण्यात भयंकर अपघात १२ वर्षीय मुलीचे अपघातात जागीच मृत्यू तर ४० वर्षीय काकाचा नागपूर ला नेताना वाटेत मृत्यु

149

ताडोबा अभयारण्यात भयंकर अपघात : दोन मृत अग्रवाल परिवारास ताडोबा अभयारण्यात जंगल सफारी करणे बितली जिवावर १२ वर्षीय मुलीचे अपघातात जागीच मृत्यू तर ४० वर्षीय काकाचा नागपूर ला नेताना वाटेत मृत्यु

चिमूर/आज दिनांक.०१/१२/२०२० ला नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्य विलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुम चा भडगा नाला मध्ये फोर्ड ची एन्डोव्हर कार १२ वर्षीय सना अभिषेक अग्रवाल राहणार नागपूर येथील असून वळण एस या आकाराचे वळण मार्ग असून नव्याने रोडचे काम सुरू असल्याने वाहनवरून नियंत्रण सुटले व कार नाल्यात पलटी मारल्याने मुलगी जागीच मरण पावली असून दुसरे तिचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय ४० वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाला.
तर या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.
या सहा पैकी २ जनांचे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.