ब्रम्हपूरी शहरालगत असलेल्या चांदगाव रोडवरील डोंगेघाट तलावात एक प्रेत पाण्यात तरंगताना आढळला

26

तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपूरी  :-  शहरालगत असलेल्या चांदगाव रोडवरील डोंगेघाट तलावात एक इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली.

सविस्तर माहिती नुसार मृतकाचे नाव संतोष पारधी वय ४२ देलनवाडी (ब्रम्हपूरी) हा दोन-तीन दिवसांपासून घरून निघून गेला होता.यांची तक्रार ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.मृतक हा दारू व्यसनाधीन असुन त्याला दारू पिण्यासाठी नाही मिळाली तर बेभानपणे वेडसर पणे कृती करत होते.आज सकाळी धावण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तलावातील पाण्यामध्ये एक प्रेत तरंगत असलेले दिसले.

यांची माहिती ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला देण्यात आले.माहिती होताच ब्रम्हपूरी पोलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह श्व्वछेदनासाठी ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले.