एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ

38

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ
मुंबई :— कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळाता एसटीच्या अनेक योजनाही ठप्प झाल्या होत्या. त्यामुळेच एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेला 30 नोव्हेबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र,पुन्हा या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मुदतवाढीबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्यांपासून 100 टक्यापर्यंत प्रवासी भाडयामध्ये सवलत देते. या सवलत योजनेला लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे अनेक प्रवाशांना प्रत्यक्ष आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने व प्रत्यक्ष भेटून आगारात माहिती देता येत नसल्याने या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील,त्या भागामध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.