मूल तालुक्यातील मारोडा येथील प्रशांत मेश्राम व सिंतळा येथील सुखदेव लटारे यांचे धानाचे पुंजणे जळाल्याने शेतक—यांना तत्काळ 10 हजाराची मदत

95

मूल : सध्यास्थितीत तालुक्यात धानाची कापणी—बांधणी जोमात सुरू असताना निसर्ग शेतक—यांना साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे धानाचे नुकसान होवू नये यासाठी शेतकरी धानाची कापणी केल्याबरोबर बांधनीसुध्दा करून शेतात पुंजणे तयार करून ठेवले आहे. परंतु,समाजातील मानसिक विकृती असलेल्या मनोवृत्तीच्या व्यक्तीकडून शेतात उभे केलेल्या धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार मूल तालुक्यात घडला. वर्षभर मेहनत करून हजारो रूपये खर्च करून हाती आलेले धानाचे उत्पन्न पेटवून दिल्याने शेतक—यांच्या तोंडातला घासच हिरावल्या गेल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना कळताच त्यांनी शेतक—यांच्या मदतीला धावून धानाचे पुंजणे जळालेल्या शेतक—यांचे सांत्वन करून त्यांना तत्काळ दहा—दहा हजाराची मदत धनादेशाव्दारे दिली.
मूल तालुक्यातील सिंतळा येथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव दादाजी लटारे यांची 0.50हेक्टर शेती असून त्यांनी नुकतीच धानकापणी करून शेतात पुंजणे उभे केले होते. दरम्यान अज्ञान व्यक्तीकडून पुंजण्याला आग लावून जाळल्याने शेतक—याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना मदतीचा हात आकस्मिक नुकसानभरपाई म्हणून शेतकरी कल्याण निधीतून बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी तत्काळ 10 हजार रूपयांचा धनादेश शेतक—याला दिला.तालुक्यातील मारोडा येथील दोन एकर अल्पभूधारक शेतकरी येथील दोन एकर अल्पभूधारक शेतकरी प्रशांत बालाजी मेश्राम यांच्याशी शेतातील धानाचा पुंजणा अज्ञान व्यक्तीने जाळून खाक केल्याने प्रशांत मेश्राम नामक शेतक—याचेही फार मोठे नुकसान झाले.त्यांनाही तत्काळ मध्यवर्ती सहकारी बॅंक मूल शाखेत बोलावून आकस्मिक मदत म्हणून दहा हजाराचा धनादेश दिला.
नुकसान ग्रस्त मारोडा येथील प्रशांत मेश्राम व सिंतळा येथील सुखदेव लटारे या दोन्ही शेतक—यांना मदतीचा हात म्हणून धनादेश देताना मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,पं.स.सदस्य तथा बाजार समितीचे संचालक संजय मारकवार,सभापती तथा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनूरकर,संचालक राकेश रत्नावार,अखिल गांगरेडीवार,शांताराम कामडे,डॉ.पदमाकर लेनगुरे, नगरसेवक विनोद कामडे,रूमदेव गोहणे, जिडीवार सर,गणेश खोब्रागडे,प्रदीप कामडे,बॅंकेचे व्यवस्थापक नंदू मडावी,जिडगिलवार यांच्यासह शेतकरी बांधव व कर्मचारी उपस्थित होते.