चकदुगाळा येथील धानाचे पुंजणे आगीत खाक

47

चकदुगाळा येथील धानाचे पुंजणे आगीत खाक
मूल : तालुक्यातील चकदुगाळा येथील जनार्धन रामाजी उराडे यांच्या सामूहिक मालकीच्या एकुण शेतजमिनीपैकी 2 हेक्टर 40 आर.शेतजमीन सुखदेव दादाजी लवारे यांनी एका वर्षासाठी ठेक्याने घेतली होती. ठेक्याने घेतलेल्या शेतात सुखदेव लवारे यांनी दिवसरात्र परिश्रम करून धानाची पेरणी केली. निसर्गाने यावेळी ब—यापैकी साथ दिल्याने कापणीअंती धानाचे उत्पन्न समाधानकारक मिळेल,अशी शेतकरी सुखदेव लवारे यांना आशा होती.
कापणी केलेला धान चुरणा करण्याच्या उद्ेशाने 14 नोव्हेंबर रोजी मजुराच्या मदतीने शेतात पुंजणे करून ठेवल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सुखदेव लवारे यांनी पुजणे करून ठेवलेल्या धानाला एका अज्ञान इसमाने आग लावली.शेतातील पुंजण्याला आग लावल्याचे लक्षात येताच अग्नीशमन पथकाला पाचारण करण्यात आले परंतु,आग विझेपर्यंत संपूर्ण धान जळून खाक झाले.लागलेल्या आगीत सुखदेख लवारे यांचे 1 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून नूकसानीची भरपाई मिळावी,अशी अपेक्षा आहे. दरम्यान,धानाच्या पुंजण्याला लावण्यात आलेल्या आगीच्या घटनेची पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस सदर घटनेचा शोध घेत आहेत.