Home आपला जिल्हा Breaking News राजोलीच्या परिसरात रानटी हत्तींचा मुक्काम, ग्रामस्थांमध्यें भितीचे वातावरण

राजोलीच्या परिसरात रानटी हत्तींचा मुक्काम, ग्रामस्थांमध्यें भितीचे वातावरण

114

मूल : रानटी हत्तींनी आता आपला मोर्चा मूल तालुक्याकडे वळवीला आहे. मूल तालुक्यातील राजोली पासून 7 कि.मी.अंतरावर असलेल्या मुरमाडी-गोलाभुज परिसरात मागील दोन दिवसांपासून रानटी हत्तींनी मुक्काम ठोकला असून काल गांवालगत असलेली शिवराम कुमरे यांची झोपडी पाडुन नुकसान केले. गावांपासून अवघ्या एक ते दिड कि.मी. अंतरावर 30 ते 32 रानटी हत्तींचा मुक्काम असल्याने ग्रामस्थांमध्यें भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे कर्मचारी हत्तींना हाकलण्याचे प्रयत्न करीत आहेत परंतू हत्तीच्या मुक्कामाचे ठिकाण तलावालगत आणि गर्द जंगला लगत असल्या मिळणा-या थंड वातावरणामूळे रानटी हत्तींनी आपला मुक्काम अद्याप कायम ठेवला आहे. गांवालगत 30 ते 32 रानटी हत्तींचा मुक्काम असल्याने ग्रामस्थांशिवाय परिसरात कुतुहलासोबतचं भितीचे वातावरण पसरले असून हत्तीना पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान रानटी हत्तींपासून कोणतीही जीवीत आणि वित्त हानी होवू नये याकरीता वनविभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून हत्तींना हाकलण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे समजते.
जंगलापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांतील नागरीकांना वन्यजीवांपासून धोका निर्माण झाला असून वन्यजीवांपासून धोका टाळण्यासाठी वनविभागाने जंगलालगतच्या गावांना तारेच्या कुंपणाचे संरक्षण दिले पाहिजे. याकरीता शासन दरवर्षी कोटयावधी रूपये खर्च करते परंतू प्रत्यक्षात मात्र तारेच्या कुंपणावर लाखो रूपये खर्च होवून उर्वरीत निधी मात्र भ्रष्टाचाराच्या पोत्यात जमा करते. हे दुदैव आहे.
भोजराज मुट्टावार,
माजी उपसरपंच मुरमाडी